वृक्ष लागवड करून जागतिक पर्यावरण दिन साजरा
भंडारा
, :औद्योगिकरण व शहरीकरणामुळे जंगलतोड होत आहे, वाढत्या उष्णतेने जंगलात लागणारे वणवे यामुळे जंगल नष्ट होत आहे. याचा थेट परिणाम हा मानवावर होत आहे. अति उष्णता, अवकाळी पाऊस हि त्याचीच करणे आहे. चालू हंगामात भंडारा मध्ये उन्हाने उच्चांक गाठला पारा ४५ च्या पार गेला. त्यामध्ये तीनदा चारदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले अति उकाड्याने नागरिक हैराण झाले. एवढे होऊनही मानव काही सुधारायला तयार नाही. पर्यावरणाचे रक्षण हि सर्वांची जिम्मेदारी आहे."झाडाची रक्षा हीच मानवाची सुरक्षा" आणि "मानव झाडांना करू नकोस नष्ट ,अन्यथा श्वास घेताना होतील कष्ट " त्यासाठी सर्वानी वृक्षलागवडी कडे वळण्यासाठी व्यापक प्रमाणात जाणीवजागृती होणे गरजेचे आहे. जागतिक पर्यावरण दिनी प्राथमिक आरोग्य केंद्र विरशी,लेंडेझरी,जांब येथे वैद्यकीय अधिकारी,आरोग्य कर्मचारी यांनी वृक्षलागवड केली तसेच लागवड केले वृक्ष आरोग्य कर्मचारी यांनी दत्तक घेऊन त्याचे जतनकरण्याची शपथ देखील घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्र विरशी येथे वृक्षारोपण करताना वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.