Uncategorized

जिल्ह्यातील सर्व पशूंची इअर टॅगिंग करुन त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेणे बंधनकारक जिल्हा पशुसंवर्धन उ kiपायुक्त भंडारा विभागाचे आवाहन

जिल्ह्यातील सर्व पशूंची इअर टॅगिंग करुन त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेणे बंधनकारक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त भंडारा विभागाचे आवाहन

    भंडारा :इअर टॅगिंग असल्याशिवाय 1 जून 2024 नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री करता येणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने हा निर्णय घेतला असून, 31 मार्च 2024 पर्यंत इअर टंगिग बधनकारककरण्यात आले होते . विशेष म्हणजे हे टॉगिंग असल्याशिवाय शासनाच्या पशुवैद्यकीयसंस्था, दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवाही बंद केल्या जाणार आहेत.
     पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध नियंत्रण करण्याकरिता तसेच प्राण्यांमधीलसंक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2001 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने याबाबत निर्देश दिले आहेत .कोणत्याही प्रकारच्या जनावराचीइअर टॅगिंग शिवाय वाहतूक केल्यास सबंधित वाहतुकदार, कारवाई होणार आहे.नैसर्गिक आपती विजेचा धक्का मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचे टॅगिंग असल्याशिवाय मालकांना नुकसानभरपाई मिळणार नाही. 
    जनावराच्या विक्रीकरिता वाहतूक करताना राज्यातील जनावरांचे टॅगिंग असल्याची खात्री करूनच पशुधन विकास अधिकारी पशुसंवर्धन सहआयुक्त आरोग्य प्रमाणपत्र व वाहतूक प्रमाणपत्र देणार आहेत.त्यानुसार इअर टॅगिंग आणि भारत पशुधन प्रणालीवर जनावरांची नोंद बंधनकारक करण्यात आली आहे.त्यामुळे जनावरांची जन्म-मृत्यूची नोंदणी, प्रतिबंधात्मक औषधोपचार, लसीकरण, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क, खरेदी-विक्रीची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे.
   महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धनविभागाकडून जनावरांना कानावर बिल्ले (टॅगिंग) लावणे बंधन कारक करण्यात आले आहे.भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि इअर टॅगिंग असल्या याशिवाय 1 जून 2024 नंतर कोणत्याही जनावराची राज्यात खरेदी-विक्री करता येणार नाही. कोणत्याही प्रकारच्या जनावरांची इअर टॅगिंग शिवाय वाहतूक करण्यावर बंदी राहणार आहे. 
   जनावरांना इअर टॅगिंगनसल्यास संबंधित वाहतूकदार, जनावराचे मालक यांच्यावर कारवाईहोणार आहे. इअर टॅगिंग भारत पशुधन प्रणालीवर शेतकऱ्यांनी नोंद आणि इअर टॅगिंगकरणे आवश्यक आहे. गोपालकांनी जनावरांचा इअर टॅगकाढूनये अथवा फाडू नये, जनावरांचा टैग पडला असेल किवा जनावरांची नवीन खरेदी केली असेल तर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये त्याची नोंद करून भविष्यामध्ये येणाचा पशुधनाच्या योजना यांचा लाभ घेण्यासाठी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त भंडारा ,यांनी केले आहे.

00000000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button