Breaking Newsताजा खबरसंपादकिय

जनतेचे प्रेम आणि उत्साह आहे, सहकारी पण मेहनतीने प्रचार करत असल्याने विजय आमचाच – सुनिल मेंढे

भंडारा – श्रीरामनवमी च्या शुभपर्वावर बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजित भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती.भंडारा-गोंदिया क्षेत्राचे खासदार सुनिल मेंढे यांनी या बाईक रॅलीमध्ये सहभाग नोंदवत आपली उपस्थिती दर्शवली यावेळी परिसरातील वातावरण सकारात्मक आणि भक्तिमय झाले आहे. बुधवारी मोठ्या संख्येने जनतेच्या उपस्थितीत सुनिल मेंढे व भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी बाईक रॅलीमध्ये जय श्रीराम चे नारे लावत तरुणांसोबत बाईक रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन दाखवले यावेळी सुनील मेंढे यांनी माध्यमांशी सुद्धा संवाद साधला.


भंडारा-गोंदिया येथील जनतेच्या भावना मला समजतात आणि त्यांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी जनता माझ्यावर विश्वास दाखवत आहे व सकारात्मक प्रतिसाद सुद्धा देत आहे. सोबत सहकारी कार्यकर्ते यांची मेहनत यशस्वी ठरणार असून प्रभु श्रीरामांच्या आशिर्वादामुळे विजय महायुतीचाच असेल असा विश्वास सुनिल मेंढे यांनी दाखवला. संपूर्ण प्रचारात सर्व उमेदवारांमध्ये आघाडीवर असलेले सुनिल मेंढे यांनी आपल्या सकारात्मक शैलीने सर्वसामान्य लोकांच्या भावना आपल्या गोठात सामावून घेतल्या असल्याचे या बाईक रॅली मध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली. प्रभु श्रीरामांच्या भव्य बाईक रॅलीत भाविक भक्तांसह सकल हिंदू समाजातील संघटना व महायुतीतील कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

जिल्ह्यातील पवनी येथे प्रचारादरम्यान राजे शिवाजी महाराज शेतकरी संघटना, विदर्भ प्रांत या संघटनेनी सुद्धा सुनिल मेंढे यांना जाहिर पाठिंबा देत सुनिल मेंढे यांना पाठिंबा पत्र सुपूर्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हिताची अनेक कामे केली. भविष्यातही शेतकऱ्यांचे कल्याण करण्याची क्षमता भाजपा सरकारमध्येच आहे. याच विश्वासातून महायुतीचा उमेदवार म्हणुन निवडून देण्याचे आवाहन या पत्राद्वारे संघटनेने केले आहे. याप्रसंगी अध्यक्ष धनंजय लोहबरे, संस्थापक विश्वजीत हुमने, अतुल नागदेवे, आयुष झंझाड, अनूप ढोके, सचिन कुथे व अन्य सदस्यगण उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button