ताजा खबर

युवा नेते किशोर पचभाईसह शेकडो तरुण शिवसेनेत

भंडारा :- भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या विकसनशील नेतृत्वावर विश्वास ठेऊन पवणीचे युवा नेतृत्व किशोर पांचभाई यांनी आज शेकडो युवकांसोबत शिवसेनेत प्रवेश केला.प्रवेश करणाऱ्यांमध्ये किशोर पंचभाई,मुकेश जांभूळकर,युगल हटवार,वैभव देशमुख,हुमदेव वाघमारे,योगेश निखारे,धीरज बोरुले,अमोल देसमुख,सचिन सोमनाथे,क्षितिज हटवार, विठुल बावनकर,गोलू जांभूळकर आदींचा समावेश होता.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल गायधने,पवनी तालुका प्रमुख प्रशांत भुते,विधानसभा प्रमुख बाळू फुलबंधे, माजी पवनी शहर प्रमुख नरेश बावनकर आदी उपस्थित होते.आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भगवा दुपट्टा घालून प्रवेश करनाऱ्यांचे स्वागत केले.आमदार नरेद्र भोंडेकर यांच्या प्रयत्नाने भंडारा विधानसभा मतदार संघाला भरघोस निधी मिळाला असून कधी नव्हे तो विकास झाला आहे.त्यांच्या धडाकेब   कामगिरी ने प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश केल्याचे किशोर पचभाई यांनी सांगितले.                                                                       

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button