सध्या बाजारात जंगली मशरूमची मोठी मागणी होत आहे, ग्रामीण भागातून मशरूम शहरात विकायला येत असतात. भंडारा जिल्ह्यात जंगली मशरूम ची मागणी वाढत आहे सध्या श्रावण मास सुरू असल्यामुळे मास मटन बंद आहे,त्यामुळे त्याची चव मटन सारखीच असते बाजारात मटन चा भाव 700 रुपये आहे मात्र जंगली मशरूम 800 ते 1000रुपये भाव मिळत असून मागील वर्षापेक्षा यंदा कमी प्रमाणात मशरूम आढळत असल्याने मशरूमचे दर गगनाला भिडले आहेत.जंगली मशरुम् विक्रेत्यांना चांगले दिवस बघायला मिळत आहेत.