तुमसर:-दिनांक 31/12/2022 रोज शनिवार ला सकाळी माडगी देवस्थान येथे संपन्न झालेल्या जत्रेतून तेथे पसरलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ करण्याची मोहीम ‘वर्षांच्या अंतीम दिनी काहीतरी वेगळे’ या भावनेतून हाती घेण्यात आली व त्यात माडगी येथील बांधवांच्या साथीने मोहिमेला विशेष असे स्वरूप प्राप्त झाले. सुरुवातीला प्रतिष्ठान च्या मावळ्यांनी स्वच्छतेला सुरुवात केली व नंतर ग्रामस्थांनी मदतीचा हात देत. “लोग जुडते गये और कारवा बढता गया” ची प्रचिती आणून दिली. यावेळी माडगी येथील प्रा.अरविंद सेलोकर, श्री.श्रीधरजी हिंगे ग्रा.प.सदस्य माडगी, श्री.नरेशजी पारधी, श्री. कालिदासजी वणवे, श्री.शंकरजी रेड्डी व ग्रामस्थ यांच्या व प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष इंजि. नितीन धांडे व प्रतिष्ठान चे सचिव प्रा. अमोल उमरकर व मावळे यांच्या श्रमदानातून प्रस्तुत मोहीम पार पडली.
