Homeताजा-खबरवाघाच्या दहशतीने गावातील व्यवहार ठप्प

वाघाच्या दहशतीने गावातील व्यवहार ठप्प

रौंधा :- सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत वसलेल्या जंगलव्याप्त व आदीवासी बहूल तुमसर तालक्यातील रोधा गावात मागील चार दिवसांपासून तीन पट्टेदार वाघांनी धुमाकूळ घातला. वाघांचे दर्शन होत असल्याने गावात दहशत पसरली असून वाघाला पळविण्यासाठी वनविभागाचे पथक गावात डेरेदाखल आहे. वनपथक गावकऱ्यांसह रात्रीला पहारा देत असून फटाके फोडून वाघाला पळविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. वाघाच्या दहशतीमुळे अख्या गाव रात्र जागत आहेत. तर शेती व पशुधनाला तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे. परिणामी रौंधा गावात तणावपूर्ण शांतता असून गावाबाहेरील गायकन्यांना रात्रीच्या वेळी गावात जेवणाची व्यवस्था करून आश्रय दिला जात आहे.रोधा शेतशिवारात ४ दिवसापूर्वी प्रभूदास सलामे यांच्या बैलावर वाघाने हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. तसेच गावातील भाऊदास राऊत या च्या म्हशीच्या बछड्याला ठार केले. देवनाव दुरगडे यांच्या शेळ्यांवर हल्ला चढवून ठार केले. तर कारू दुरगडे यांच्या गायीला ठार केले. चार दिवसात बाघाने अनेक पाळीव जनावरांचा फडशा पाडला. गावकऱ्यांना चार दिवसापासून वाघाचे दर्शन होत असल्याने गावात प्रचंड दहशत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img