भंडारा :- तमाम पत्रकारांचा आवाज बुलंद करणात्क्त्या आणि लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी हे ध्येय समोर ठेऊन राज्यातील वरिष्ठ संपादकांच्या पुढाकाराने राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या नेतृत्त्वात स्थापन झालेल्या व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेचे राज्याध्यक्ष ज्येष्ठ संपादक राजा माने, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक यांच्या सुचनेनुसार भंडारा जिल्हाध्यक्ष नंदकिशोर परसावार यांनी भंडारा जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे.

संघटनेच्या कार्याध्यक्षपदी राजू मस्के, उपाध्यक्षपदी समशेर खान व दीपक फुलबांधे, सरचिटणीस कविता मोरे व सागर भांडारकर, कोषाध्यक्षपदी उदय राऊत, संघटकपदी विजय क्षीरसागर व अभिजीत घोरमारे, सहसंघटक विलास सुदामे, दीपक रोहणकर, प्रशांत निखाडे, प्रवक्ता नदीम खान, प्रसिद्धीप्रमुख काशिनाथ ढोमणे, कार्यवाहक युवराज गोमासे, शहर अध्यक्ष नेहाल भुरे, सदस्यपदी सुरेश कोटगले, चंद्रकांत श्रीकोंडावार, युवराज गोमासे, शीतल नंदनवार, शुभम देशमुख यांचा समावेश आहे.
तालुकाध्यक्षांची निवड
पवनी तालुका अध्यक्ष महादेव शिवरकर, तुमसर तालुका अध्यक्ष मोहन भोयर, मोहाडी तालुका अध्यक्ष तथागत मेश्राम, लाखनी तालुका अध्यक्ष कल्याण राऊत, साकोली तालुका अध्यक्ष नाजीम पाशाभाई, लाखांदूर तालुका अध्यक्ष आशिष साखरे यांची निवड करण्यात आली आहे.