गावात रिक्त असलेल्या अशा स्वयंसेविक पदासाठी भरती करण्यात आली असून या ठिकाणी घोळ केल्याचा आरोप करीत ही भरती रद्द करून नव्याने निवड प्रक्रिया राबविण्याची मागणी करीत महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयापुढे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. हे उपोषण भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील सरांडी बु येथील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयापुढे सुरू केले आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील सरांडी बु येथील आशा स्वयंसेविका हे पद रिक्त होते. या पदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रक्रिये अंतर्गत घोळ झाल्याचा आरोप स्थानिक सरांडी बु येथील महिलांनी केला आहे. दरम्यान, निवड प्रक्रिया झाल्यानंतर ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी सरांडी बु येथील महिलांनी निवेदनातून केली होती. मात्र त्यांच्या निवेदनाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने संबंधितांनी आशा स्वयंसेविकेची निवड प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीला घेऊन ४ ऑगस्ट पासून सरांडी बु येथील ग्रामपंचायत कार्यालयापुढे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.