
लाखनी :- 6 सप्टेंबर 2023 रोजी काढण्यात आलेला कंत्राटी पदभरती संदर्भातील शासन निर्णय त्वरित रद्द करावा 4 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आलेला आरोग्य विभाग कंत्राटी पदभरतीचा शासन निर्णय तसेच राज्य सरकारने 62 हजार शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करून सरकारी शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात करावी सरकारी कर्मचाऱ्यांची रिक्त असलेले शासकीय विभागाचे पदे शंभर टक्के त्वरित भरावे प्राध्यापक भरती केंद्रीय पद्धतीने करण्यात यावी 55 हजार शिक्षकांची पदभरती पहिलाल्याच टप्प्यात करण्यात यावी राज्यातील सर्व प्रकारची पदभरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी मार्फत आणि राज्यात वर्षभरात होणाऱ्या विविध पद भरती प्रक्रियेसाठी मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर एकच परीक्षा शुल्क आकारण्यात यावी व राज्यातील सर्व परीक्षांच्या पेपर फुटीशी सलग्नित व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि सरकारी क्षेत्राचे खाजगीकरण थांबवण्यात यावे असा विविध मागण्याला घेऊन लाखनी शहरातील सिंधी लाईन ते तहसील कार्यालयावर सार्वभौम युवा मंच तरुणांचा महामोर्चा धडकला यात शेकडो तरुण सहभागी झाले होते.