Homeताजा-खबरपालकमंत्र्यांकडून तुमसर शहराला कोट्यावधींचा विकासनिधी

पालकमंत्र्यांकडून तुमसर शहराला कोट्यावधींचा विकासनिधी

तुमसर : राज्याचे उप मुख्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर परिषदांना वैशिष्टयपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेतून भंडारा जिल्ह्याला कोट्यावधींचा विकास निधी बहाल केला आहे. त्यातून तुमसर शहराला विविध कामे पार पाडण्यास तब्बल २ कोटी रुपयांची ठीक तरतूद विशेष ठरली आहे. त्यात शहरातील वेग वेगळ्या समाजाकरीता सांस्कृतिक व धार्मिक भवनाचे बांधकाम करण्यावर विशेष भर देण्यात आली आहे. त्याबाबतचा निधी आणि कामांची घोषणा पालकमंत्री यांच्या आदेशानव्ये माजी विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांनी केली आहे. १२ मार्चला तुमसर शहराचा दौरा करून त्या त्या प्रभागात नियोजित कामांची फुके यांनी घोषणा केली. भंडारा जिल्ह्याला ६ कोटी ५० लक्ष रुपयांच्या अनुदानात तुमसर नगर परिषदेला २, भंडारा नपला २.५, पवनी व साकोली करीता अनुक्रमे १ कोटी रुपयांचा निधी देय करण्यात आल्याचे फूके यांनी शहरात आयोजित कार्यक्रमातून बोलतांना सांगितले. त्यामध्ये तुमसर नगर परिषदेला प्रभाग क्र. ५ येथील मुक्ताई शाळेच्या बाजुला
न.प. खुल्या जागेवर, प्रभाग क्र. १२ शिव मंदीराच्या खुल्या जागेत, प्रभाग क्र.५ ढंगारे शाळेच्या प्रांगणामध्ये, प्रभाग क्र. १२ गजानन नगरीच्या खुल्या जागेवर, प्रभाग क्र.२ दत्त मंदीराच्या जागेत, प्रभाग क्र. १२ कृ.उ.बा.स. च्या समोरील न.प. खुल्या जागेवर, प्रभाग क्र.७ येथील संताजी सभागृह येथे समाज भवनाचे बांधकाम तर प्रभाग क्र.४ येथे व्यायाम शाळा बांधकाम सह
साहित्य लावणे संदर्भाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. तुमसर शहरात विकास कामांच्या निधीची घोषणा करताना विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमात प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, माजी खासदार शिशुपाल पटले सीमा देशमुख आदी उपस्थित होते.वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर परिषदांना निधी वितरीत करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने तसे निर्णय देखील पारित केले आहे. भंडारा जिल्ह्यासह तुमसर नगर परिषदेला फुके यांच्या प्रयत्नांतून मिळालेला निधी आणि त्याबाबत खर्चाचा तपशील दिनांक २८ फेब्रुवारीच्या शासन निर्णय क्रमांक नपावै २०२२ प्रक्र २३६(१७६) नवि १६ मध्ये नमूद करण्यात आलेले आहे. त्यापैकी २ कोटींचा भरीव निधी तुमसर शहराच्या विकासाला चालना देणारा नक्कीच ठरणार असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img