Homeताजा-खबरतुमसर नगर परिषदेने उघडला RRR Centre

तुमसर नगर परिषदेने उघडला RRR Centre

तुमसर :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगर परिषदेने अनोखा उपक्रम सुरु केला आहे. तुमच्या घरी वापरत नसलेली साहित्य, वस्तू, पुस्तेक, कपडे, इत्यादी फेकण्यायेवजी नगर परिषदेने उघडलेल्या RRR सेंटरला दान करण्याचे आव्हानं केलं आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने “मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर” (माझे जीवन, माझे स्वच्छ शहर) हे अभियान ३ आठवड्यांच्या कालावधीत राबविण्याचा निर्णय घेतला असून या अभियानांतर्गता नगर परिषद कार्यालय तुमसर येथे “रिड्यूस, रियुज आणि रिसायकल” सेंटर म्हणजेच RRR केंद्राचे उभारणी करण्यात आली आहे. तुमसर शहरातील सर्व नागरिकांना, आव्हानं करण्यात आले आहे. अनेक वस्तू ज्याची आपल्याला गरज नसते. म्हणुन आपण तीच वस्तू फेकून देतो किव्हा भंगारात विकतो. पण तिचं वस्तू तुम्हीं दान केली तर एखाद्या उपयोगी पडून शकते. वापरलेली जुनी पुस्तके,इलेक्ट्रॉनिक वस्तू कपडे, पादत्राणे आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करून त्यांचा पुर्नवापर करण्यासाठी “रिड्यूस, रियुज आणि रिसायकल” सेंटर म्हणजेच RRR सेंटर येथे आपल्या घरातील वापरात नसलेल्या सुस्थितीतील वस्तू “RRR सेंटर” मध्ये जमा करावे आणि गरजवंतांना मदत करावी जेणेकरून संकलित कलेल्या वस्तू नुतनीकरण,पुनर्वापर किवा नवीन उत्पादन तयार करण्यात येईल. असे आव्हान नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img