गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध टी पाॅईन्ट, शिवाजी चौकात छत्तीसगड मधून चिचगड नवेगावबांध सानगडी मार्गे नागपूर ला जनावरे भरून भरधाव वेगात ट्रक क्रमांक MP 04 GB 4456 जात असताना त्याच वेळेस अर्जुनी-मोर- नवेगावबांध-कोहमारा या हायवेवर अर्जुनी-मोर कडून कोहमारा मार्गे आमगाव ला धान घेवून जाणारे ट्रक क्रमांक MH 33 T 2522 या ट्रक ला छत्तीसगड कडून जनावरांचा भरधाव ट्रक ने नवेगावबांध येथिल शिवाजी चौकात जोरदार धडक दिली धडक एवढी जोरदार होती की यामधे धान भरलेला ट्रक ने पलटी खाल्ली यात सुदैवाने कोणालाही गंभीर जखमी व जिवीत हानी झाली नाही. जनावरे घेऊन जाणाऱ्या ट्रक चालक किरकोळ जखमी झाले. ही संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेरे कैद झाली आहे. या घटनेचा गुन्हा नवेगावबांध पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. गुन्हा क्रमांक 46/23 अन्वये प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत भा.द.वी. 279, 427 अन्वये दाखल करण्यात आला. ट्रक मधिल सर्व जणावरे मीनी ट्रक च्या सहाय्याने शासन मान्य ज्ञान फांऊडेशन साकोली च्या गोशाळेत पाठविण्यात आली….