Homeताजा-खबरभंडारा जिल्ह्यासाठी पाऊस, वादळी वारा, गारपीट व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज

भंडारा जिल्ह्यासाठी पाऊस, वादळी वारा, गारपीट व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज

भंडारा दि.15 जिल्ह्यामध्ये, भारतीय हवामान खात्याव्दारे प्राप्त महितीनुसार दिनांक 16/03/2023 ते 19/03/2023 दरम्यान विजेच्या कडकडाट, सोसाट्याच्या वारा व गारांसह पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे

कृषी सल्ला:
• पाऊस व गारपिटीचा अंदाज लक्षात घेता रब्बी हंगामातील परिपक्व अवस्थेतील (हरभरा, गहू, मोहरी, जवस इत्यादी.) पिकाची काढणी व मळनीची कामे तत्काळ उरकून घ्यावी.
• कापणी व मळणी च्या कामास पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यास कम्बाईन हार्वेस्टर द्वारे काढणीची कामे करून घेण्यास प्राधान्य द्यावे.
• कापणी झाली असल्यास व पिक शेतामध्ये पसरले असल्यास शेतामध्ये उंचवटा असलेल्या ठिकाणी जमा करून ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने शेतमाल झाकून ठेवावा.
• कापणी व मळणी केलेला शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी.
• मेघगर्जनेसह विजांची शक्यता लक्षात घेता शेतामध्ये काम करत असताना दोन व्यक्तींमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवावे. मेघगर्जनेची चाहूल लागताच तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. झाडांखाली आसरा घेणे कटाक्षाने टाळावे.
• शेळ्या, गाय, म्हैस व इतर पाळीव जनावरांना झाडाखाली न बांधता त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे.
• जनावरांना मोकळ्या जागेत चारावयास सोडण्याचे टाळावे तसेच गोठया मधेच चारा व पाण्याची उपलब्धता करून घ्यावी.
• गोठ्याची देखभाल आणि दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावी.
• विजांच्या ठीकांनांचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी – लाईटनिंग अलर्ट (Damini : Lightning Alert) या मोबाईल एपचा वापर करावा तसेच विजांपासून बचावासाठी एप मध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा.

दामिनी – लाईटनिंग अलर्ट (Damini : Lightning Alert) हे एप खालील लिंक वापरून गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करावे. https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini&hl=en_IN&gl=US
• बाजारायोग्य फळे व भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी

विजेपासून बचाव व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन संदर्भात आवश्यक अद्यावत माहिती वेळीच प्राप्त करण्यासाठी कृपया 9767968166 हा क्रमांक DDMA Bhandara या नावाने आपल्या मोबाईल मध्ये save करावा. आणि व्हाट्सअप मध्ये जाऊन सदर क्रमांकावर Hi असा मेसेज पाठवावा. मेसेज पाठविल्यावर एक मेनू प्राप्त होईल. त्या मेनू मधील आपल्याला हवी असलेली माहितीचा क्रमांक पुन्हा मेसेज केल्यावर आपणांस आवश्यक असलेली माहिती तात्काळ मिळू शकेल.ही सुविधा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भंडारा यांनी नागरिकांच्या माहितीसाठी सुरु केलेली आहे.असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भंडारा यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img