भंडारा :- नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात होत असलेल्या चर्चेत आ. नरेंद्र भोंडेकर यांनी आज पॉईंट ऑफ ईंफॉरमेशन आणि लक्षवेधी असे दोन मुद्दे मांडले. यात बंद झालेली धान खरेदी केंद्रे हि शेतकरी हितात सुरु ठेवण्यात यावी आणि लक्षवेधि प्रश्न मध्ये अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राची विद्युत दरे अधिक असल्या मुळे उद्योग धंदे बंद पडत आहे किंवा अन्य राज्यात हलविण्यात येत आहे. जर विद्युत दारात सवलत मिळाली तर विदर्भात उद्योग निर्मिती होऊ शकेल. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर देऊन नवीन विद्युत पॉलीसी आणत असल्याचे सांगितले.
लक्षवेधि प्रश्न मांडतांना आ. भोंडेकर म्हणाले कि आता पर्यंत जवळपास ३६ स्टील व्यवसाय बंद पडले किंवा येथून अन्य राज्यात हलविण्यात आले. त्याच्या मागे एकच कारण आहे कि अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात विद्युत दरे अतिशय जास्त आहेत. ते म्हणाले कि आम्हाला गर्व आहे कि आमच्या विदर्भात ७० टक्के विद्युत निर्मिती होते. पण याचा फायदा विदर्भाच्या उद्योगाला कधी होईल? असा प्रश्न त्यांनी सदन समोर मांडला. आ. भोंडेकर म्हणाले कि विदर्भातील उद्योग त्यात स्टील असो अथवा तांबे पिताळाचा त्यांना जर विद्युत दरात सूट मिळाली तर विदर्भात उद्योगांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल. राज्याच्या तुलनेत विदर्भाला अति मागासलेले म्हणत असले तरीही विदर्भात पाणी, वने त्याच प्रमाणे दुध आहे परंतु उद्योग नाहीत. विद्युत दरात सूट मिळाली तर विदर्भातही मोठ्या प्रमाणात उद्योग निर्मिती होऊ शकेल. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर देत माहिती दिली कि देत माहिती दिली कि विदर्भात विद्युत आधारित उद्योग बंद होत आहेत, त्याचे उदाहरण म्हणून भंडारा जिल्यातील एका खनिज उद्योगाचा उल्लेख करीत सांगितले कि आठ हजार लोकांना रोजगार देणारा हा उद्योग निव्वळ विजेच्या कारणांनी बंद पडला. अश्या प्रकल्पांना पुनर्ज्जीवन मिळावे म्हणून शासन तर्फे नवीन पॉलिसी तयार केली जात आहे. आपली दरे अधिक असली तरीही महाराष्ट्रात विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात त्या मुळे ही दरे अन्य राज्याच्या तुलनेत फार कमी होतात. गरज आहे ती फक्त योग्य प्रकारे वीज वापरायची. या करिता लवकरच एक इको सिस्टीम लागू करण्यात येणार आहे.
याच प्रकारे पॉईंट ऑफ ईंफॉरमेशन दरम्यान चर्चेत आ. भोंडेकर यांनी धान खरेदी केंद्रे बंद झाल्याने शेतकरी वर येणाऱ्या अडचणींचे गांभीर्य सांगितले. आ. भोंडेकर म्हणाले कि भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गढचीरोली या जिल्ह्यात धान घोटाळ्याचे आरोप जोरावर आहेत आणि याची चौकशी सुद्धा केली जात आहे. हे घोटाळे आज पासून नाही तर अनेक वर्षा पासून होत आहे. या घोटाळ्याची चौकशी व्हावी परंतु धान खरेदी केंद्रे बंद केले तर शेतकरी संकटात येईल आणि त्याला आपला धान व्यापाऱ्याला कमी दरात विकायला मजबूर व्हावा लागेल. इतकेच नाही तर शेतकऱ्याच्या आत्महत्या सुद्धा वाढतील.