भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील एका युवकांनी चक्क तलवारीनं केक कापून वाढदिवस साजरा केला. रोहा या गावातील कमलेश बांडेबुचे याचा वाढदिवस होता. कमलेश याच्या मित्रांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कमलेश सेठ असे नाव लिहिलेले केक, कमलेशनं हातात तलवार घेवून कापले. याचा व्हिडिओ आता समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे. यापूर्वी भंडाऱ्यात तलवारीने केक कापल्या प्रकरणी बेला येथील युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.