भंडारा :- जिल्हा समाज कल्याण विभागा द्वारे जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धे चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भोंडेकर शिक्षण संस्था द्वारा संचालित डॉ. बाबा साहेब आंबेडकर निवासी मतीमंद शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावले. तसेच या खेळाडूंची राज्य स्तरीय स्पर्धे करिता निवड करण्यात आली आहे.
येथील क्रीडा संकुलात जिल्हा समाज कल्याण विभाग द्वारा आयोजित अरण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत ८ वर्ष ते १२ वर्षी आणि १२ वर्षे ते १६ वर्षे अश्या दोन वयोगट तयार करण्यात आले होते. यात १०० मीटर दौड, ५० मीटर दौड, गोळा फेक आणि जंप थ्रो बॉल या स्पर्धेचा समावेश होता. वरील स्पर्धेत डॉ बाबा साहेब आंबेडकर निवासी माती मंद शाळेच्या पाच खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावले. तसेच आठ खेळाडूंनी द्वितीय क्रमांक पटकावले आहे. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडू मध्ये विशाल भिरूड, गणेश टेकाम, कु. वांती टेकाम, कु. अंकिता वासरे, कु. आरोही गौतम यांचा समावेश आहे. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सर्व पाच खेळाडूंचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धे करिता निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांने शिक्षण संस्थेचेसचिव डॉ अश्विनी भोंडेकर, मुख्याध्यापिका कु. माया चोपकार, क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर लांजेवार, शुभम सर्वे, संदीप सेलोकर, राजू चकोले, राजेश धुर्वे, कु. वैशाली बारई, कु. प्रतिभा कुंभरे, देवेंद्र खंडाते, महेश साकुरे यांनी अभिनंदन केले आहे.