भंडारा :- नागपूर येथे सुरु असलेल्या विधी मंडळाच्या शीत कालीन सत्राचे कामकाज बघण्याची उत्सुकता असलेल्या 45 विद्यार्थिनींनी आज विधान सभा आणि विधान परिषद दोन्ही भवनांना भेट दिली. स्थनिक नूतन कन्या शाळा आणि कनिष्ठ महा विद्यालयातून पोहोचलेल्या या विद्यार्थिनींना आ. नरेंद्र भोंडेकर यांनी प्रवेश मिळवून दिला आणि सभेच्या संपूर्ण काम काजाची माहिती दिली.
भंडारा येथील नूतन कन्या शाळा तथा कनिष्ठ महा विद्यालयाच्या विद्यार्थिनींना विधान भवनाच्या शितकालीन अधिवेशनाचे कामकाज बघण्याची उत्सुकता निर्माण झाली. ज्या करिता विद्यालयाच्या प्राचार्या सौ. निळू तिडके यांनी आ. नरेंद्र भोंडेकर यांना संपर्क साधून विद्यार्थिनींना भवनात प्रवेश मिळवून देण्याचे निवेदन केले. ज्यावर आ. भोंडेकर यांनी आज दि. २६ डिसेंबर च्या दिवशी विद्यार्थिनींना घेऊन येण्याची अनुमती मिळवून दिली. या महाविद्यालयातील एकूण २५ विद्यार्थिनी आणि पाच शिक्षक हे नागपूर येथील विधान भवनात पोहोचले. या वेळी आ. नरेंद्र भोंडेकर यांनी स्वतः विद्यार्थिनींना संपूर्ण कामकाज कसे होते आणि येथील कोण कोणते विभाग असतात आणि ते राज्याच्या हिताच्या निर्णय करिता कसे कामे करतात याची संपूर्ण माहिती दिली. विद्यार्थिनींना विधान परिषद आणि विधान सभा या दोन्ही सदनातील काम काज बघण्या करिता ३०-३० मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. हे कामकाज बघून विद्यार्थिनींना याचा आपल्या अभ्यसनीय जीवनात फार उपयोग होवू शकेल. विद्यार्थिनींनी सोबत पर्यवेक्षक कैलास कुरंजेकर, शिक्षक ईश्वरदास नागरिकर, लीना चिंचमलकर,मिनाक्षी मोटघरे, मेघश्याम झंझाड उपस्थित होते
प्रत्यक्ष कामकाज पाहणे वेगळे अनुभव
आपल्या शैक्षणिक कालावधीत इतिहासा सोबत नागरिकशास्त्र शिकत आलो आहो, परंतु ते फक्त पुस्तकीय ज्ञान आहे. आज प्रत्यक्षात सदन काय असत आणि त्यात कश्या प्रकारे काम काज होतो, विरोधक कसे विरोध करतात आणि सत्तारूढ आमदार विरोधाला न जुमानता राज्याच्या हिताचे निर्णय कशे घेतात हे पाहणे म्हणजे वेगळाच अनुभव होता आणि हा दिवस आमच्या शैक्षणिक जीवनाचा अविस्मरणीय दिवस राहील.