लाखनी :- लाखनी तालुक्यातील चानला/ धानला येथील रहिवासी हिमांशू गणेश राघोर्ते वय 15वर्ष असून समर्थ विद्यालय लाखनी येथे 9 वर्गात शिकत होता. काल रात्री घरी हिमांशू अभ्यास न करता मोबाईल पाहत होता. म्हणून त्याच्या वडिलांनी अभ्यास करीत नाही म्हणून रागावले. आपल्या वडिलांनी अभ्यासासाठी रागवल्याने हिमांशू ने रागाच्या भरात रात्री सर्व झोपले असता हॉलमधील स्लॅपचे लोखंडी कडीला शाळेचे टायने गळफास लावून आत्महत्या केली. रात्री भाऊ बाथरूम साठी उठले असता हिमांशू गळफास लावले दिसल्याने हिमांशूला खाली उतरवून ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे आणले असता डॉक्टरांनी हिमांशूला मृत घोषित केले. पुढील तपास लाखनी पोलीस करीत आहेत.