ताजा-खबर
शंकर पटात बैलजोडी झाली सैराट ; अन् थेट खांबाला जाऊन धडकली….व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल..

साकोली :- शंकर पटात बैलजोडी झाली सैराट होत थेट खांबाला जाऊन धडकल्याची थरारक घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथे भरलेल्या शंकरपटात घड़ली असून याच्या व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे।त्यामुळे पटावरील बंदी हटल्यापासून शंकरपटाचा थरार पुन्हा अनुभवायला मिळू लागल्याची चर्चा रंगु लागली आहे।शंकर पट सुरु होताच एक बैलजोड़ी सैराट पळू लागली।मार्ग न मिळाल्याने बैलंजोडी समोरच असलेल्या खांबाला जाऊन आदळली। यात बैल आणि गाडा हाकणारा धराशायी झाले।दरम्यान बैलांना किंवा बैलजोडी हाकणाऱ्याला कोणतीही दुखापत झालेली नसून ते सुखरूप असल्याचे सांगितले जात आहे।आता सर्व प्रकाराचा वीडियो वायरल होत आहे.