Homeताजा-खबरजकातदार विद्यालयाच्या प्रणोती व सेजलची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

जकातदार विद्यालयाच्या प्रणोती व सेजलची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

भंडारा :- भारतीय रिजर्व बैंक नागपूरच्या वतीने भारतीय फायनांशियल साक्षरता प्रश्नोत्तरी- २०२३ ”(all India Quiz on financial literacy) “
ही विभाग स्तरीय स्पर्धा भंडारा व गोंदीया या दोन जिल्हयामिळून गोंदिया येथे नुकतीच घेण्यात आली आहे. यास्पर्धेत भंडारा येथील जकातदार विद्यालयातील इय्यता ८ वीची कु. प्रणोती राजेश सेलोकर व वर्ग नववीची कु. सेजल भूषण हीवसे या दोन विद्यार्थीनींनी प्रथम क्रमांक पटकाला आहे.या पुरस्काराचे स्वरूप म्हणून स्मृतीचिन्ह व दहा हजार रुपये देऊन गौरविण्यात आले आहे. अशाप्रकारे जकातदार विद्यालयाच्या प्रणोती व सेजलची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. व १४ जुलै- २०२३ ला मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या असून सदर स्पर्धेकरिता संपूर्ण खर्च आरबीआय करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. जकातदार विद्यालयाच्या प्रणोती व सेजलने आपल्या यशाचे मुख्याघ्यापक श्रेय एम. जी. कुर्झेकर, मार्गदर्शक कु. गायत्री काटेखाये व आई- वडिलांना दिले असून त्यांचे सर्वत्रच अभिनंदन केले जात आहे. आणि त्यांच्या पुढील वाटचालीकरिता सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, सहाय्यक शिक्षक धनराज हटवार, आभा नंदनवार, चंद्रकुमार नंदनवार, राजेश सेलोकर, क्रिडा शिक्षक धनंजय बिरणवार व शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img