काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या होत असलेल्या अपमानाचा निषेध करीत सावरकरांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचावे या दृष्टीने उद्या रोजी भंडारा जिल्ह्यात सावरकर सन्मान यात्रा काढल्या जात आहे. भंडारा विधानसभेत भंडारा शहरात ही यात्रा निघणार असून या यात्रेत सावरकर प्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन खासदार सुनील मेंढे व आ. नरेंद्र भोंडेकर यांनी केले आहे.
भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वतीने राज्यात ४ एप्रिल पासून सावरकर सन्मान यात्रा काढली जात आहे. राज्यातील २८८ विधानसभा क्षेत्रामध्ये ही यात्रा निघणार असून भंडारा विधानसभा क्षेत्रातील यात्रा भंडारा शहरात निघेल. राजीव गांधी चौकातून ही यात्रा निघणार असून शहरातील प्रमुख मार्गाने प्रवास करून गांधी चौकात यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने सावरकर प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार सुनील मेंढे आणि आ. नरेंद्र भोंडेकर यांनी केले आहे.