भंडारा : भंडारा शहरापासून ७ किलो मीटर अंतरावर असलेल्या भिलेवाडा येथील दादा धुनीवाले देवस्थानात गांधी विचार मंच, मुंबई सर्वोदय मंडळ मुंबई, किर्तन केंद्र मुंबई, समीर वर्ल्ड काॅम्पुटर एज्युकेशन भंडारा व रामपा बहु. सेवाभावी संस्था भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पाच दिवसापासून ग्रिष्मकालीन संस्कार शिबीर सुरू आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी विभाग राज्य सहकार्य वाह विष्णुदास लोणारे संस्कार शिबीर प्रमुख विलास केजरकर सहशिबिर प्रमुख यशवंत बिरे दादाजी धुनिवाले (मठ) देवस्थानचे कार्याध्यक्ष प्रतिकुमार टांगले वैभव चेटूले नितेश बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
त्यात मान्यवरांकडून विविध विषयांवर शिबिरार्थींना मार्गदर्शन करण्यात येत असते. त्यात शिबिरार्थ्यांनी हसत खेळत विज्ञानाचे धडे गिरवले आहे.
या शिबिरात हसत खेळत विज्ञानाचे प्रयोग लहान मुलांना शिकविण्यात आले. त्यावेळी स्वतः प्रयोग केले आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी विभाग राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे यांनी हसत खेळत विज्ञान व विज्ञानाचे प्रयोग सांगितले आहे.