महाराष्ट्र

कवलेवाडा येथे संस्कार शिबीराचा समारोप

भंडारा:- आज शहरी भागात अनेक शाळेत, शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी म्हणून संस्कार शिबीर घेतले जातात. मात्र ग्रामीण भागात अनेक वेळा विद्यार्थ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असते. विद्यार्थी दशेत निराश न राहता त्यावर कशी मात करावी ? विविध भेडसावत असणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा सामना हसत खेळत करावे. तसेच आजचे विद्यार्थी हे मोठ्या माणसांचा आदर सन्मान करणे विसरत आहेत. युवक- युवती शिक्षणाच्या भरोश्यावर विविध क्षेत्रात उंच भरारी मारत आहेत. आणि ते आवश्यक आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणात त्यांच्यात संस्काराचा अभाव पहावयास मिळत आहे. म्हणून विद्यार्थांच्या सर्वांगीण कलागुणांना वाव मिळण्यासाठी शहरी – विद्यार्थ्यांप्रमाणे ग्रामीण विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कवलेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनराज शेंडे यांनी केले.ते भंडारा पंचायत समिती, शिक्षण विभाग व कारधा केंद्रातंर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवलेवाडा येथील ग्रीष्मकालीन नि:शुल्क संस्कार शिबिराचा समारोप करतांना बोलत होते.
शिबिरार्थ्यांना विविध उदाहरण देऊन बाल पणापासूनच संस्काराचे बीजारोपण करावे असे मोलाचे मार्गदर्शन करून संस्काराचे महत्त्व पटवून देण्यात आले.शिबिरादरम्यान प्रदीप काटेखाये ज्योती धनराज उईके यशवंत बिरे धनपाल उके (शंकरावाला) एस. डी. भिवगडे इत्यादी मान्यवरांनी संस्कार गीत योगासन -प्राणायाम व्यक्तीमत्व विकास स्फुर्ती गीत कथा कथन, स्मरण शक्ती खेळ टाकाऊ तून टिकाऊ ग्रेटिंग कार्ड लिफाफा बीज संकलन पक्षी बचाव गांधीच्या जिवनावर आधारित गांधी परिक्षा, हसत खेळत विज्ञान, आपत्ती व्यवस्थापन, नृत्य अशा प्रकारे सादरीकरण करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी संस्कार शिबिरात सामाजिक कार्यकर्ते तथा संस्कार शिबीराचे प्रमुख विलास केजरकर, सहशिबीर प्रमुख राहुल मेश्राम यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून गौरविण्यात आले.
नाविण्यपूर्ण संस्कार शिबीरात उत्कृष्ट शिबिरार्थ्यी म्हणून मान्यवरांच्या यांच्या हस्ते उत्कृष्ट शिबिरार्थ्यी म्हणून सार्थक बोंदरे व राधा चामट यांना महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित पुस्तके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी शिबिरार्थ्यांना मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.सहभागी शिबिरार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मंगला खंडाते सिंधू गणविर राधा चामट इत्यादी शिबीरातील विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button