महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, उपविभाग मानेगाव अंतर्गत व भंडारा तालुक्यात येणाऱ्या सिल्ली येथील शेतक-यांच्या शेतातील रोवणी आटोपली आणि काही वेळातच विद्युत खांब कोसळल्याची घटना घडली आहे. मात्र त्यात होणतीही जीवित हानी झाली नाही हे विशेष.
शेतातील (पोल) खांब दीड ते दोन फूट खड्डे खोदून पोल लावण्यात आले. त्या खड्ड्यात कोणतेही दगड न टाकता किंवा मास काँग्रेट न घालता मातीने बुजवण्यात आले. आणि वरून फक्त वरुन सिमेंट मास काँग्रेटचा मुलामा चढविण्यात आला आहे. त्यामुळे विद्युत खांब कोसळल्याने विद्युत विभागाचा भोंगळ कारभार रस्त्यावर आला आहे. परिणामी त्या परिसरातील विद्युत पाच दिवसांपासुन खंडित करण्यात आलेली विद्युत पुर्वत सुरू करून विद्युत अभावी खोळंबलेली रोवणी पुर्ण होण्यास मदत होईल. याकडे विद्युत विभागाने जातीने लक्ष द्यावे व संबंधित अधिकारी तसेच ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी सिल्ली येथील शेतकऱ्यांनी केली आहे.