ईडी, सीबीआय चा गैरवापरबाबद भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे दिले निवेदन

भंडारा :- सत्ताधा-यांकडून होत असलेल्या बिगर भाजप शासित राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकशाही मुल्यांना पायदळी तुडवून सत्तेचा गैरवापर करून ईडी, सीबीआय, एनआयबी अशा केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करुन विरोधी पक्षांची मुस्कटदाबी करण्यासाठी सत्ताधारी प्रयत्न करत आहेत. सातत्याने केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करत लोकशाहीत सक्षम विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न विद्यमान सरकार फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात करतेय. लढाई नैतिकतेने विकास कामाने न लढता कारस्थाने करुन राजकीय वातावरण खराब करुन संपुर्ण देशात पहिल्यांदा असे राजकारण लोक बघताय. जे खूपच खालची पातळी घातलीय सत्तेसाठी वाटेत ते आणि वाटेत तसा हा विद्यमान राज्य आणि केंद्राचा अजेन्डा अतिशय निषेधार्य असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नवाब मलिक, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, आणि आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना ईडीचे नोटीस पाठवून हैराण करण्याचे षडयंत्र सुरु आहे

या कार्यवाहींना विरोध(निषेध) करण्याकरीता व जनतेच्या भावना सरकारला पोहचविण्यासाठी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे मा. जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थितांमध्ये भंडारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. नाना पंचबुध्दे, प्रदेश महासचिव श्री. धनंजय दलाल, यशवंत सोनकुसरे, स्वप्निल नशिने, हेमंत महाकाळकर, अॅड. नेहा शेंडे, राजु सलाम पटेल, देवचंद ठाकरे, सदाशिव ढेगे, मनोज वासनिक, योगेश सिंगनजुड़े, सुनिल साखरकर, उमेश ठाकरे, राजेश वासनिक, सचिन गायधने,मनीष वासनिक,गणेश बाणेवार, फरहान पटेल, संजय वरगंटीवार,रजिया गेडाम, राजेश डोरले, अनिल कळंबे, रवि लक्षणे, विक्रम उजवणे, भारत लांजेवार, अनुप बागडे, स्नेहल मेश्राम, संजय सतदेवे, अरुण अंबादे, विजय बारई व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याबाबत योग्य कार्यवाही झाली नाही तर संपुर्ण जिल्हाभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला.