Homeताजा-खबरभंडाऱ्यातील गडेगाव येथे आढळला दुर्मिळ 'ल्युसिस्टिक कोब्रा'….

भंडाऱ्यातील गडेगाव येथे आढळला दुर्मिळ ‘ल्युसिस्टिक कोब्रा’….

ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचा सर्पमित्र विवेक बावनकुळे, सौरभ बोरकर तसेच पंकज भिवगडे यांना सुधीर कुंभरे (गडेगाव) यांच्या घरी नाग असल्याची माहिती मिळाली. त्यांनी या नागाला शिताफीने बरणीबंद केले. हा एक दुर्मिळ प्रकारचा अर्धवट पांढरट ‘ल्युसिस्टिक कोब्रा’ असल्याचे आढळले. याची माहिती ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांना दिली.अशा प्रकारातला ल्युसिस्टिक कोब्रा साप सापडण्याची महाराष्ट्रातील ही प्रथमच घटना आहे. यावर रिसर्च पेपर सायंटिफिक जर्नलमध्ये अरण्ययात्रीचे सुधीर भांडारकर, ग्रीनफ्रेंड्सचे आशिष वलथरे व विवेक बावनकुळे यांच्या सहाय्याने प्रकाशित करण्यात येऊन प्रथमच आढळलेल्या ल्युसिस्टिक कोब्राची नोंद विज्ञान नियतकालिकात घेण्यात आली. त्यानंतर या कोब्राचे स्केलेशन केल्यानंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img