भंडारा जिल्ह्यातील ग्राम सकारला येथे भगवान बाबा हनुमान जी च्या सेवक संमेलन कार्यक्रमांमध्ये गणेशपुर येथील जनसेवक पवन मस्के यांच्या सत्कार करण्यात आला. शाल व श्रीफळ देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला जनसेवक पवन मस्के हे सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी सातत्याने शासन प्रशासनाशी भांडत असतात त्यांच्याच या कार्याची पोचपावती म्हणून त्यांच्या सत्कार यावेळी करण्यात आला.

यावेळी जनसेवक पवन मस्के यांनी या स्नेह सेवक संमेलनामध्ये सर्व सेवक सेविका यांना मार्गदर्शन करत सांगितले की या मार्गात आल्याने अनेक व्यक्तींचे फायदे झाले बाबा हनुमान जीसेवेत बाबा जुमदेवजीच्या च्या विचारावर चालल्याने अनेक कुटुंबीयांच्या उद्धार झाला या मार्गात आल्याने येणाऱ्या पिढ्या ही व्यसनमुक्त राहतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने जनसेवक पवन मस्के, देवा इलमे, जिल्हा परिषद सदस्य किरण अतकरी जि प सदस्य, नरेश ईश्वरकर जि प सदस्य अनिता नालगोपालवार, जि प सदस्य मिलिंद सोमनाथे सरपंच,
गुलशन जी सर्वे उपसरपंच रत्नकलाबाई डोळे माजी सरपंच
यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी करिता सकरला येथील युवा एकता मंचचे
नागोराव हलमारे आकाश डोये सुनील नागफासे जयदेव डोये मिताराम आगाशे आणि
सर्व सदस्यांनी सहकार्य केले.