तुमसर :- सुप्रसिद्ध भगवान नृसिंह मंदिर श्रीक्षेत्र माडगी येथे २५ डिसेंबर रोजी आयोजित नृसिंह महोत्सव व श्री संत हनुमानदासजी (अण्णाजी) महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे नेतृत्व सर्वांचे लाडके नेते माजी पालक मंत्री तथा मा.विधान परिषद सदस्य डॉ परिणय फुके यांच्यासह माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य व शेकडो कार्यकर्त्यां सोबत उपस्थती दर्शवली. दरम्यान विविध धार्मिक कार्य त्यावेळी भारतीय जनता पार्टीहस्ते पार पडले. त्याचा आनंद आणि थोरांचे आशीर्वाद देखील लाभले. दरम्यान भगवान नृसिंह महोत्सव व श्री संत हनुमानदासजी (अण्णाजी) महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील माडगी येथील श्री क्षेत्र नृसिंह मंदिर टेकडी दंडकारण्य वैनगंगा आश्रमात दर्शन व मा.धर्मभूषण श्री गंगानंद महाराज नागपूरकर जी यांचे आशीर्वाद घेतले

या वेळी श्री प्रशांतजी मानमोडे महाराज, श्री निलकंठजी पुडके, डॉ. हरेंद्रजी रहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य श्री बंडुभाऊ बनकर, जिल्हा परिषद सदस्य श्री दिलीपजी सार्वे, जिल्हा परिषद सदस्य श्री महादेवजी पचघरे, जि.प. सभापती श्री राजेशजी सेलोकर, श्री भगवानजी चांदेवार, श्री मुन्नाजी फुंडे, श्री बाबुजी ठवकर, श्री भावरावजी लांडे, श्री राजेंद्रजी पटले, श्री के.के. पंचबुध्दे, श्री सुनिलजी पारधी, श्री गणेशजी कुकडे, श्री संतोषजी वहिले, श्री सुर्यकांतजी सेलोकर, श्री महेंद्रजी शेंडे, श्री सचिनजी बोपचे, श्री यादवराव मुंगमोडे उपस्थित होते.