भंडारा :- भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयांतर्फे वाय २० (Youth-20) या उपक्रमाअंतर्गत युवकामध्ये जी 20 (G-20) विषयी जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम व स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्यातील एका महाविद्यालयाची निवड करण्यात आलेली आहे. यासाठी भंडारा जिल्ह्यातून जे. एम. पटेल महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे. या निवडीअंतर्गत महाविद्यालयात येत्या २ मार्च ला वक्तुत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना ११ मार्च रोजी सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी, पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
महाविद्यालयातील या स्पर्धांच्या उदघाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय ठाकरे सहसंचालक, उच्च शिक्षण, नागपूर विभाग व डॉ. विकास ढोमणे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. उदघाटन प्रसंगी डॉ विकास जांभुलकर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, रा.तू.म.ना.वि.नागपूर यांचे जी 20 या विषयावर विद्यार्थ्यांना उद्बोधन करणार आहेत. वाय २० हा उपक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावरील जी २० परिषदेचा भाग असून या परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्याचा बहुमान या वर्षी भारताला मिळाला ही आपल्या सर्वासाठी अभिमानाची बाब आहे. या परिषदेचे ब्रीदवाक्य ” वसुधैव कुटूंबकम,-एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य” असे घोषित करण्यात आले, असे डॉ ढोमणे यांनी सांगितले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या स्पर्धामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्यांमार्फत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी समन्वयक म्हणून डॉ.कार्तिक पनीकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे विभिन्न कार्यक्रम राबविण्यासाठी डॉ प्रदीप मेश्राम,डॉ.श्याम डफरे,डॉ.पद्मावती राव,डॉ.विनी ढोमणे,श्री संदीप राहुल,डॉ.रोमी बिश्त,डॉ.जितेंद्र किरसान व श्री भोजराज श्रीरामे कार्यरत आहेत.