भंडारा :- राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेने जुन्या पेन्शन योजने साठी राज्य व्यापी बेमुदत संप पुकारला असून यात सर्व शिक्षक संघटना सहभागी आहेत.
सध्या 10 वी 12 वी बोर्डाच्या परीक्षा सुरू असून विध्यार्थ्यांचा शैक्षणिक हित लक्षात भंडारा जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक/शिक्षक/शिक्षकेत्तर संघटनेच्या वतीने 10 वी 12 वी च्या परीक्षेवर बहिष्कार न घालता ज्यांची परीक्षा केंद्रावर ड्युटी आहे त्यांनी काळ्या फीत लावून परीक्षेची जबाबदारी पूर्ण करावी तसेच जे शिक्षक परीक्षेत नाही त्यांनी संपात सहभागी होण्याचे आव्हान मुख्याध्यापक संघ, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ भंडारा, शिक्षक भारती संघटना जिल्हा भंडारा, विजुक्टा संघटना भंडारा, शिक्षक परिषद भंडारा, विना अनुदानित शाळा कृती समिती भंडारा, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना भंडारा जिल्हा शालेय शिक्षण कर्मचारी समन्वय समिती भंडारा इत्यादीने केले आहे.