महाराष्ट्र सरकार विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची मागणी

आज दिनांक २८/०४/२०२३ रोज शुक्रवारला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमा दरम्यान दि. १६ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या नवी मुंबईतील खारघर मृत्युकांड १५ निष्पाप अनुयायांचा मृत्यू झाला. या संदर्भात शिंदे फडणवीस सरकार विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा यांना श्री. नाना पंचबुध्दे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, श्री. धनंजय दलाल प्रदेश महासचिव राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, श्री. मधुकर कुकडे माजी खासदार, यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी उपस्थितांमध्ये जिल्हाध्यक्षा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सरिता मदनकर, श्री. यशवंत सोनकुसरे, श्री. हेमंत महाकाळकर, स्वप्निल नशिने, श्री. नारायणसिंग राजपूत, अश्विन बांगडकर सौ.मंजुषा बुरडे, किर्ती गणविर, सचिन गायधने, श्री. रोहीत युरडे, सौ. संध्या बोदेले, सौ.हर्षिला कराडे, सौ. संजोक्ता सोनकुसरे, ता. अध्यक्ष सदाशिव ढेंगे, अमन मेश्राम, सुनिल साखरकर, गणेश वाणेवार, मनिष वासनिक, उमेश ठाकरे, रिना साखरकर, विष्णु कढिखाये, संजय वरगंटीवार, राजेन्द्र राखडे, राजेश वासनिक, रिना साखरकर, सौ. संगीता चव्हाण, सौ. राजेश्री राखडे, सौ. विद्या साखरे, डॉ. पोर्णीमा वाहाणे, किरण राघोर्ते, डॉ. अनिता महाजन, सौ.सीमा रहांगडाले, भावना नंदेश्वर, लोकेश नगरे, राजु पटेल, फरहान पटेल, प्रदीप सुखदेवे, तसेच मोठया संख्येने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी महाराष्ट्र सरकारवर मनुष्य वधाचा गुन्हा न नोंदविल्यास संपुर्ण जिल्हाभर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला