भंडारा : शिक्षक हा संस्कार विद्यार्थ्यांवर घडवतो. जो शिक्षक निर्व्यसनी असतो तोच विद्यार्थ्यांवर खरे संस्कार घडवू शकतो. म्हणून शिक्षक व्यसना पासून मुक्त असावा. विद्यार्थ्याने त्या शिक्षकाला आपले आदर्श मानायला हवे असल्याचे वक्तव्य आ. नरेंद्र भोंडेकर यांनी केले. ते भंडारा जिल्हा खाजगी अनुदानित शाळा सेवा निवृत्त कर्मचारी संघाच्या स्नेह मिलन समारोहाला उद्घाटक म्हणून संबोधित करीत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ नितीन तुरास्कर यांच्या अध्यक्षते खाली आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संघाचे अध्यक्ष टिचकुले यांनी सेवानिवृत्त शिक्षकांची व्यथा मांडत पेन्शन संबंधीच्या आदेश बद्दल माहिती दिली आणि शासन दरबारी प्रश्न सोडवण्याची मागणी केली. यावर आ. भोंडेकर आपल्या वक्तव्यात म्हणाले कि शिक्षकांना खोटी आश्वासने देणार नाही. या संदर्भात आलेल्या परिपत्रकाची माहिती घेऊन संचालकाशी भेट घडवून आणू आणि परिपत्रक मागे घेण्यास बाध्य करू. हे परिपत्रक शासन निर्णय असेल तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटू.
कारण शिक्षक म्हणजे समाज घडवणारा घटक आहे आणि या घटकाला कसलाही त्रास होऊ देणार नाही. भंडाऱ्यात शिक्षकांची हक्काची जागा म्हणून शिक्षक भवन चा निर्माण होत असल्याचे सांगून या करिता २५ लक्ष रुयाचा निधी मंजूर झाला असून आणखी २५ लक्ष देण्यात येणार असल्याचे सांगितले. भंडारा जिल्ह्याच्या विकास कामा बद्दल बोलताना ते म्हणाले कि गोंदिया चा समावेश भंडाऱ्यात होत होता तरीही भंडारा जिल्हा हा मागासलेला राहिला. कारण भांडार जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींची इच्छा शक्ती विकास करण्यास कमी पडली. भंडाऱ्याचा मागासलेला जिल्हा हे डाग हटविणे आहे. कोरोना मुळे अडीच वर्षे वाया गेली.
त्याची संपूर्ण भरपाई येत्या एका वर्षात करण्याचे आश्वासन आ. भोंडेकर त्यांनी दिले. इतकेच नाही तर भांडारा शहरातील गोर गरीबाच्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे या करिता नगर परिषद च्या ११ शाळा होत्या परंतु आता चारच उरल्या आहेत. चार शालेंचा उद्धार होत आहे आणि बंद पडलेल्या शाळांना सुरु करण्याचे प्रयत्न केले जात आहे. कार्यक्रमात मंचावर संस्थेचे अध्यक्ष जी.एस. टिचकुले, सचिव चिंतामण यावलकर आणि कार्याध्यक्ष रमेश जांगडे उपस्थित होते
