Homeताजा-खबर*उन्हाळ्यात होणाऱ्या पाणी टंचाई वर मात करण्यास स्त्रोत निर्माण करा : आ....

*उन्हाळ्यात होणाऱ्या पाणी टंचाई वर मात करण्यास स्त्रोत निर्माण करा : आ. नरेंद्र भोंडेकर

भंडारा : भंडारा विधान सभे अंतर्गत असलेल्या भंडारा व पवनी पंचायत समिति तिलकामांचा आढावा घेण्य करिता आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या अध्यक्षते खाली रविवारी आम सभा आयोजित करण्यात आली. पवनी येथील पंचायत समिती तसेच भंडारा येथील जिल्हा परिषद सभागृहात आयोजित या सभेत पंचायत समिती चे सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. या दर्मियान उन्हाळ्यात होणाऱ्या पाणी टंचाई संदर्भात हि विशेष चर्चा करण्यात आली. ज्या नंतर आ. नरेंद्र भोंडेकर यांनी ज्या गावात पाणीटंचाई होते तेथे पाण्याचे स्त्रोत निर्माण करून टंचाई दूर करण्याची सूचना दिली.
कोरोनाकाळातील दोन वर्षे गेल्या नंतर भंडारा व पवनी पंचायत समिति ची आढावा बैठक पहिल्यांदा घेण्यात आली. या दोन्ही सभेत आ. नरेंद्र भोंडेकर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. सभेत तालुक्यातील अधिकाऱ्यांनी द्वारेमागील आमसभेत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली गेली ज्यावर चर्चा करण्यात आली. सोबतच वर्ष 2021-22 या वर्षात राबविण्यात आलेल्या योजनेचा आढावा आ. भोंडेकर यांनी घेतला.

ज्यात उपस्थित तालुका विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाची सविस्तर माहिती मांडली. ज्यात विभागाला मिळणार खर्चित आणि आखर्चित निधी, नगरिकांकरीत चालविली जाणारी योजना, योजना राबविण्यात येणाऱ्या अडी अडचणी वर चर्चा करण्यात आली. माहिती घेतल्या नंतर आ. भोंडेकर यांनी प्रत्येक विभागा मार्फत चालविल्या जाणाऱ्या शासकीय योजना नगरिकांपर्यंत अधिकाधिक पोहोचविणे आणि त्यांना याचा लाभ मिळवून देण्याची सूचना दिल्या. यात कृषि विभागा अंतर्गत चालणाऱ्या योजना ताडपत्री, शेती यंत्रणे, शेत तळे सारख्या अन्य योजना सुद्धा ग्राम  पंचायतीच्या माध्यमातून शेतकऱ्यान लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न करावे. सोबतच योजना राबवितांना गावातील लोक प्रतिनिधींना विश्वासात घेवून पात्र शेतकऱ्यांचं लाभ देण्याची सूचना आ. भोंडेकर यांनी दिली.

आ. नरेंद्र भोंडेकर म्हणाले कि जी ग्राम पंचायत शासनाच्या संपूर्ण योजना लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवून देईल त्या ग्राम पंचायतीचापुढील आम सभेत पुरस्कृत करून त्यांना सम्मानित करण्यात येईल.याच सभेत भंडारा विधान सभा क्षेत्रात उन्हाळ्यात होणाऱ्या पानी टंचाई ची संपूर्ण माहिती आ.  भोंडेकर यांनी घेतली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सूचना देतांना ते म्हणाले कि दोन्ही तालुक्यातील ज्या गावात पाणी टंचाई निर्माण होते त्या गावा मध्ये पाणी चे स्त्रोत निर्माण करून गावांना पाणी टंचाई पासून मुक्त करावे. या करिता महाराष्ट्र शासन च्या माध्यमातून २५० कोटी मंजूर करवून घेण्याचा प्रयत्न सुरु असून ते लवकरच मंजूर होतील असे आश्वासन आ. भोंडेकर यांनी दिले. या आढावा बैठकीला भंडारा व पवनी तालुक्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुख, सरपंच, पंचायत समिती सदस्य व सभापती उपस्थित होते.
शासनाच्या आदेश अनुसार गावात होणाऱ्या आम सभेत महसूल विभागाचे तलाठी व आरोग्य विभागाचे कार्म्चर्यंना उपस्थित राहणे गरजेचे असते. परंतु हे कर्मचारी काम चुकारपणा करून सभेत उपस्थित राहत नाहीत. या आम सभे दरम्यान अश्या कर्मचाऱ्यांची तक्रार सभेत उपस्थित सरपंचांनी केली. यावर आ. भोंडेकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना सूचना दिल्या कि जे कर्मचारी कामचुकार पणा करतात आणि सभेला उपस्थित राहत नाहीत अश्या कर्मचाऱ्यांवर चौकशी लावून ते दोष आढळल्यास त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात यावी. इतकेच नाही तर अन्य विभागात हि कामचुकार कर्मचारी असतील तर त्यांच्यावर सुद्धा नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश आ. भोंडेकर यांनी दिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img