Homeक्राइम"MY LAST PIC AND ALL GOOD BYE"आणि तरुणीने केली आत्महत्या.

“MY LAST PIC AND ALL GOOD BYE”आणि तरुणीने केली आत्महत्या.

महिला दिनीच
इंस्टाग्राम वर गुड बाय करत तरुणीने केली आत्महत्या.

लाखांदूर:-जागतिक महिला दिनी इंस्टाग्राम वर स्वतःचा फोटो शेअर करून गुड बॉय म्हणत एका तरुणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.गायत्री गजेंद्र रामटेके वय २० वर्ष असे मृतक तरुणीचे नाव असून ती मूळची भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील करांदला येथील रहिवाशी असून तिने चंद्रपूर येथील घुटकाला वार्डातील भाड्याच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे.मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळले नसले तरी तिने इन्स्टाग्राम वर स्वतःचा फोटो शेअर करत, हा माझा शेवटचा फोटो, Good By असं म्हणत तिने गळफास घेत आत्महत्या केली.गायत्री गजेंद्र रामटेके (20) ही भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील करांडला या गावतील आहे.तिचे आईवडील यापूर्वीच मृत्यू पावले असून बहीण भाऊ असे दोघेच कुटुंबात असताना गायत्री ही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी चंद्रपूर येथे राहत होती. ती चंद्रपुरातील घुटकाला वार्डात स्पर्धापरीक्षेच्या तयारी साठी भाड्याच्या घरात रहात होती, याच घरात तिने गळफास घेत जीवनयात्रा संपविली, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी पोहोचले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चंद्रपूर शहर पोलीस पुढील तपास करत आहे.आज सर्वत्र जागतिक महिला दिनी महिलांच्या हक्काची लढाई लढण्याचा संकल्प केला असताना एका सुशिक्षित मुलीने आत्महत्या का केली असा प्रश्न अनुत्तरित जरी असला तरी पोलिसांच्या तपासात मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img