भंडारा तालुक्यातील खुटसावरी येथे दिनांक 13 मार्च 2023 ते 15 मार्च 2023 पर्यंत शंकर पटाचे आयोजन करण्यात आले आहे. शंकर पटाच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त जनसेवक पवन मस्के यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहुन उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात प्रगत होत चाललेली आहेत. तरी सर्व महिलांनी देखील ग्रामीण भागात प्रत्येक क्षेत्रात समोर राहावेत आणि शकरपटात देखील अनेक गावात महिलांच्या बैलबंडी प्रथम पारितोषिक जिंकतात. तरी महिलांनी शंकर पटात उपस्थित राहावे असेही पवन मस्के त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कार्यक्रमात प्रामुख्याने पवन मस्के डॉ. चंद्रकांत निंबार्ते, धनंजय तिरपुडे ,कांचन वरठे, प. समिती सदस्य मनीषाताई वासनिक, सरपंच संदीप खंडाते, उपसरपंच सगदिप भोयर, पोलीस पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता युथ ग्रुप सावरी चे नरेश भुते मंगेश शेंडे साजन हारगुडे ,सतीश रामटेके, हर्षल हारगुडे यांनी व इतरांनी सहकार्य केले.