दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी मध्य प्रदेश, जिल्हा सतना मॅरेथॉन 21 किलोमीटर स्पर्धेमध्ये श्री जयपाल भोयर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, तसेच 27 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा रायगड येथे झालेल्या सुधागड हिल मॅरेथॉन 21 किलोमीटर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला, सदर स्पर्धेमध्ये त्यांना रोख पारितोषिक व सुवर्णपदक स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. जयपाल भोयर हे मूळ निवासी – निलज खुर्द, तहसील मोहाडी, जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून सध्या ते महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा संकुल घाटकोपर मुंबई येथे पोलीस दलातील नवीन खेळाडूंना प्रशिक्षण देऊन उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू बनविण्याचे काम करीत आहेत
