सुधीर मुनगंटीवार व खा.सुनील मेंढे यांच्या उपस्थितीत नागझिऱ्यात सोडणार दोन वाघिणी

भंडारा जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्य विशाल आणि घनदाट जंगलामुळे प्रसिद्ध आहे. वाघ, बिब्बट, अस्वल, हरणे इ. प्राणी असूनही अभयारण्याला वन्यजीव प्रेमींचा अल्प प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. या जंगलात एकूण ११ वाघ असून त्यामध्ये ९ नर वाघ व २ वाघिणी आहेत. नुकत्याच एका वाघाचा आपसात झालेल्या झुंजीत मृत्यू झाला होता. निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी अधिकच्या वाघिणीची आवश्यकता होती. वन्यजीव प्रेमी यासाठी सातत्याने मागणी करीत होते. क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांनी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना प्रत्यक्ष भेटून यासाठी मागणी केली होती, त्याला यश मिळून व आवश्यक परवानग्या प्राप्त करून, वेगळ्या वंशाच्या दोन वाघिणी ताडोबा अभयारण्याकडून भेट म्हणून मिळणार आहे. दि.२० मे २०२३ रोजी या वाघिणींना महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार व खा. सुनील मेंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागझिरा अभयारण्यातील निलय विश्रामगृहा समोर जंगलात सोडण्यात येणार आहे. यामुळे पट्टेदार वाघांची संख्या वाढून पर्यटनाला चालना मिळेल व रोजगारांच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.