भंडारा जिल्ह्यातील दगडी कनेरी गावातील टेकडी खनन माफियानी खोदकाम करून उध्वस्त केला असल्याने आता ह्या टेकडीवरील उत्खनन थांबवावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
लाखनी तालुक्यातील दगडी कनेरी गावालगत टेकडी आहे. या टेकडीवर मोठ्या प्रमाणत दगड असल्याने गोंदियातील एका खाजगी कंत्राटदाराने 2006 पासुन उत्खनन सुरू केलं. गावातील ग्रामपंचायत ची कुठलीही पूर्व परवानगी न घेता उत्खनन सुरु केलं. तसेच टेकडीवर झाडे असुन त्यासाठी वनविभागाची परवानगी घेतली नाही. गावकऱ्यांनी या संदर्भातील विचारणा केली असताना कंत्राटदारांनी सांगीतले की वरच्या स्थरावरून परवानगी घेतली आहे. पण ग्रामपंचायत अधिनियम अंतर्गत गावा शेजारी कुठलाही काम करायचा असेल तर ग्रामपंचायतिचे नाहरकत प्रमणपत्र घेणे बंधनकारक आहे. पण या कंत्राटदारांनी कुठलीही परवानगी घेतली नसल्याने आता गावकऱ्यांनी काम बंद करावं असा पत्र देखिल जिल्हाधिकारी यांना दिला आहे. जर काम बंद झाला नाहीं तर तीव्र आंदोलन करणार असल्याने गावकऱ्यांनी सांगीतले आहे.