गोंदिया :- गोंदिया शहराजवळील कारंजा-पिंडकेपार येथे नवीन रेल्वे रुळाचे सध्या बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामाजवळ पट्टेदार वाघिणीचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. हा परिसर नवेगाव नागझिरा टायगर रिझर्व भागाला लागूनच आहे. काही दिवसांपूर्वीच चंद्रपूर जिल्ह्यातून नवेगाव नागझिरा टायगर रिझर्व भागामध्ये दोन वाघिणी सोडण्यात आलेल्या आहेत. त्या पैकी ही एक वाघीण असावी असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी पट्टेदार वाघिणीचे दर्शन झाल्याने गोंदिया जवळच्या स्थानिक जंगल व्याप्त परिसर भागामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.