Homeमहाराष्ट्रभर उन्हात आदिवासी बांधवांचा वनविभागाच्या विरोधात एल्गार

भर उन्हात आदिवासी बांधवांचा वनविभागाच्या विरोधात एल्गार

गोंदिया : जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त देवरी व सालेकसा तालुक्यात मोठ्या प्रमाणात तेंदूपत्ता संकलन केले जाते. देवरी वन हक्क कायद्याने वना लगत राहणारे व वनावर ज्यांची उपजीविका अवलंबून आहे, अशा आदिवासी व इतर पारंपरिक वन निवासी यांना सामूहिक वन हक्क व वनातील गौण उपज यावर स्वामित्व हक्क प्राप्त आहे. पण वन विभाग त्यांच्यावर हक्कावर गदा आणत असल्याचा आरोप ग्रुप ऑफ ग्रामसभेने केला असून या विरोधात वन हक्क प्राप्त गावकऱ्यांनी देवरी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणामध्ये १६ जण सहभागी असुन ५० च्या वर गावातील नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. एवढेच नव्हे तर विदर्भातील यवतमाळ, अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील ग्रुप ऑफ ग्रामसभा च्या सदस्यांनी पाठिंबा दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img