भंडारा :- आज जि प हाय तथा कनिष्ठ महाविद्यालय पालोरा येथे श्रीकृष्ण जयंती निमित्ताने दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
इयत्ता 5 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.कार्यक्रमाचा मनमुरादपणे आनंद घेतला. वर्ग 7 वी च्या विद्यार्थ्यांनी(मुलींनी) एकावर एक स्तर रचून दहीहंडी अथक परिश्रम करून(अतिशय जिद्दीने) फोडली.कार्यक्रमाचा जि प प्राथमिक शाळा पालोरा येथील विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग घेतला. कार्यक्रमाचा पालक मंडळींनी सुध्दा आस्वाद घेतला.कार्यक्रमानंतर गोपालकाल्याचा वाटप करण्यात आला.विजेत्या गटाला मुख्याध्यापक मा श्री व्ही सी मेश्राम यांचेकडून रोख 501/-रुपये देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री व्ही सी मेश्राम, कु कांबळे मॅडम,मदन मेश्राम सर,रंदये सर,निमजे सर,शेंडे मॅडम,सतीश समरीत सर,सचिन मेश्राम सर ,राऊत मॅडम,सावरकर मॅडम,बन्सोड मॅडम ,शेंडे बाबूजी,शेंदरे बाई,उईकेजी यांनी सहकार्य केले.