भंडारा :- महिला शकतिकरणाचा जागर करण्यासोबतच केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलामध्ये महीलांचा सहयोग वाढविण्यासाठी प्रोत्साहीत करण्याच्या हेतूने दिल्ली येथून निघालेली सीआरपीएफची महीला बाईक रँलीचे आज भंडारा शहरात आगमन झाले.

यावेळी या रँलीचे भंडारा करांनी ठिकठिकाणी जंगी स्वागत केले. पाच राज्याचा तब्बल 1300 किलोमीटरचा प्रवास करीत ही रँली भंडारा शहरात आल्यानंतर येथील पोलिस कवायत मैदानावर महीला बाईकर्स चा फुल देवुन स्वागत करण्यात आले या वेळी शाळकरी विद्यार्थ्यांनी देश भक्ती पर गीत आणि नृत्य सादर करित उपस्थितांना मंत्र मुग्ध केले