तुमसर:-छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान तुमसर द्वारा करण्यात आली किल्ले आंबागड येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी बालपणातच छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीचे बाळकडु देणार्या अवघ्या महाराष्ट्राच्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गडकिल्ले संवर्धन मोहिमेअंतर्गत किल्ले आंबागड येथे स्वच्छता करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे व युवा दिवसाच्या अनुषंगाने स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे गडावर पूजन व माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली.राजमाता जिजाऊ जयंती एक अविस्मरणीय क्षण दिनांक 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती प्रतिष्ठानमार्फत दर वर्षी प्रमाणे किल्ले आंबागड येथे करण्याचे ठरविले. सर्वप्रथम किल्ल्याची स्वच्छता करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रतिष्ठानचे युवा मावळे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या पाश्र्वभूमीवर चैतन्यमय होऊन युवाशक्तीने, या युवा दिवसाला साक्षी ठेवत कार्य करत होते. गडकिल्ल्यांचे महत्त्व किती व कसे आहे हे त्यांच्या कार्यशक्तीतून अनुभवण्यास मिळाले स्वच्छते नंतर लगेच राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, जिजाऊ गर्जना, दीप प्रज्वलन करून व मोहिम पूर्ण झाली या मोहिमेत जिल्ह्यातील युवा शक्तिने सहभाग नोंदवीला ज्यात परसवाडा, सिहोरा, बघेडा, आंबागड, जाम, पिटेसुर, तुमसर, एकलारी, वरठी, केसलवाडा येथील युवक मावळ्यांचा मोठ्या संख्येने समावेश होता.
