Homeताजा-खबरगडकिल्ले संवर्धन" अभियान अंतर्गत छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या मावळ्यांनी श्रमदानातून केली...

गडकिल्ले संवर्धन” अभियान अंतर्गत छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या मावळ्यांनी श्रमदानातून केली स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगड दुर्ग स्वच्छता मोहीम फत्ते.

तुमसर:-स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या मावळ्यांची चमू दिनांक 24/02/2023 रोज शुक्रवार ला रवाना झाली प्रथम महाराजांची राजधानी किल्ले रायगड समाधी दर्शन व दुर्ग स्वच्छता करण्यात आली यावेळी दुर्ग पाहण्यासाठी आलेल्या नाशिक येथील शिवकार्य प्रतिष्ठान चे मावळे व महाड येथील व स्थानिकांच्या सहकार्याची सार्थ साथ लाभली हे विशेष. दुसर्‍या दिवशी गडांचा राजा व छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी किल्ले राजगड गाठून गडप्रेमीना जाणिवजागृती पर संदेश दिला. पिण्यासाठी पाण्याची बाटली ज्याप्रमाणे गडावर घेऊन जातात त्याचप्रमाणे रिकाम्या बाटल्या गडावर न फेकता त्या आपल्या सोबत परत नेता येतील किंवा त्यांची योग्य ती विल्हेवाट लावता येईल. असा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने उपस्थित असलेल्यांना देण्यात आला. प्रस्तुत मोहीम छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान चे संस्थापक/अध्यक्ष इंजि. नितीन धांडे यांच्या नेतृत्वाखाली तर कोषाध्यक्ष प्रतीक बुद्धे, संपर्कप्रमुख कोमल वानखेडे, सुमित जिभकाटे, सतीश दमाहे, अंकुश गभणे,नितीन सार्वे इत्यादींच्या परिश्रमातून यशस्वी झाली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img