तुमसर:-स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या मावळ्यांची चमू दिनांक 24/02/2023 रोज शुक्रवार ला रवाना झाली प्रथम महाराजांची राजधानी किल्ले रायगड समाधी दर्शन व दुर्ग स्वच्छता करण्यात आली यावेळी दुर्ग पाहण्यासाठी आलेल्या नाशिक येथील शिवकार्य प्रतिष्ठान चे मावळे व महाड येथील व स्थानिकांच्या सहकार्याची सार्थ साथ लाभली हे विशेष. दुसर्या दिवशी गडांचा राजा व छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी किल्ले राजगड गाठून गडप्रेमीना जाणिवजागृती पर संदेश दिला. पिण्यासाठी पाण्याची बाटली ज्याप्रमाणे गडावर घेऊन जातात त्याचप्रमाणे रिकाम्या बाटल्या गडावर न फेकता त्या आपल्या सोबत परत नेता येतील किंवा त्यांची योग्य ती विल्हेवाट लावता येईल. असा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने उपस्थित असलेल्यांना देण्यात आला. प्रस्तुत मोहीम छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान चे संस्थापक/अध्यक्ष इंजि. नितीन धांडे यांच्या नेतृत्वाखाली तर कोषाध्यक्ष प्रतीक बुद्धे, संपर्कप्रमुख कोमल वानखेडे, सुमित जिभकाटे, सतीश दमाहे, अंकुश गभणे,नितीन सार्वे इत्यादींच्या परिश्रमातून यशस्वी झाली.