भंडारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिना निमित्त बालासाहेभांची शिवसेना तर्फे महा आरोग्य शिबिराचे आयोजन अरण्यात आले. येथील जिल्हा रुग्णालयात घेण्यात आलेल्या शिबिराचे उद्घाटन आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धन्वंतरी च्या तैलचित्राचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी अध्यक्ष म्हणून उपस्थित असून शिबिरा मध्ये विविध प्रकारच्या व्याध्यांची तपासणी आणि उपचार करण्याकरिता नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या चिकित्सकांची चमू आली होती. शिबिराला मुख्यमंत्री शिंदे यांनी आन लाईन विडीयो द्वारे संबोधित करून नागरिकांच्या स्वस्थ आरोग्याची कामना केली. या शिबिरात दिव्यांग व्यक्तींना बॅटरी वर चालणारे ट्रायसिकल, अपंगत्व चे प्रमाणपत्र तसेच अपंगांन अनुदान राशी चे धनादेश वितरीत करण्यात आले.

शिबिराच्या उद्घाटन समारंभास संबोधित करताना आ. भोंडेकर म्हणाले कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवसाचा मिनित्त साधत हा आरोज्य महाशिबीर आयोजित करण्यात आला आहे. या शिबिराचे मुख्य अवचीत्य म्हणजे दिव्यांग बांधवांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देणे आणि ज्या तपासण्या करणे गरिबांना शक्य नाही त्या उपलब्ध करून देणे आहे.

आ. भोंडेकर यांनी भाषण दरम्यान आपल्या निधीतून दिव्यांगांना होऊ शकेल तितके सहकार्य करायचे वाचन दिले. इतकेच नाही त राज्य शासनाने दिव्यांगांना हक्क मिळावा म्हणून जे स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय देण्याचे ठरवले आहे त्याच्या अंतर्गत जिल्हा मुख्यालयात दिव्यांगाना सभा घेण्य करिता भवन तयार करून देण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले. सोबतच जिल्ह्या रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कमी लक्ष्यात घेता राज्याचे आरोग्य मंत्री उदय सामंत यांच्याशीन चर्चा करून अधिकाधिक भारती करून घेण्या संदर्भर चर्चा झाली असल्याची माहिती आ. भोंडेकर यांनी दिली.

इतकेच नाही तर आता मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या घोषणे प्रमाणे ग्रामीण क्षेत्रात आपला दवाखाना उघ्द्क्या जैलाच तसेच शहरातही जवळपास ५० आपला दवाखाने उघडण्याची घोषणा आ. भोंडेकर यांनी केली. उद्घाटना नंतर आ. भोंडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढ दिवसाची भेट म्हणून माता व बाल संगोपन किट चे वितरण केले. शिबिरा दरम्यान रुग्णान करिता नेत्र चिकित्सा, हृदयरोग तपासणी, थ्रीडी ईको, थॅलेसिमीया, थॉयरॉईड, , दंतचिकित्सा, अस्थिरोग, मधूमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग सारख्या तपासण्या करण्यात आल्या. या वेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल गायधने, उप जिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे, शहर प्रमुख मनोज साकोरे, शहर संघटक नितीन धकाते, महिला जिल्हा प्रमुख सविता तुरकर, पूर्व नगर सेविका आशा गायधने, जिल्हा शल्य चिकित्सक दीपचंद्र सोयाम, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी व न.प. मुख्याधिकारी विनोद जाधव उपस्थित होते.