भंडारा : मानव धर्माची स्थापना होत असताना टीका टिप्पण्या झाल्या परंतु सर्व टीका टिपण्यांना मात देऊन मानव धर्माची स्थापना झाली. सेवक होऊन सर्व दुख पासून दूर झालो असलो तरी आपले काम संपले नाही आहे. समाजातील दुखी लोकांचे दुख दूर करण्याचा प्रयत्न करायचे आव्हाहन आ. नरेंद्र भोंडेकर यांनी केले. ते परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ भोजापूर द्वारा आयोजित सेवकसम्मेलन व चर्चा बैठकिला प्रमुख अतिथी म्हणून संबोधित करीत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन रमन खेडीकर यांनी विनोद राघोर्ते अध्यक्षतेत केले.
भोजापूर येथे आयोजित सम्मेलनातला संबोधित करताना आ. भोंडेकर म्हणाले कि समाजातील ज्येष्ठ सेवक हे अनुभवी आहेत आणि त्यंच्या अनुभवाचा लाभ नवीन सेवकांना होणे गरजेचे आहे. त्या करिता अश्या चर्चा बैठकीचे आयोजन होत राहिल्या पाहिजे. ते पुढे म्हणाले कि सेवक धर्म घेवून आपण दुखा पासून दूर झालो पण आता आपल्या जवळच्या लोकांनाही दुखातून बाहेर काढणे आपली जवाबदारी आहे. आ. भोंडेकर यांनी आपले अनुभव सांगताना म्हणाले कि पूर्वी जेव्हा गावा गावात ते सायंकाळी फिरायचे तेव्हा रस्त्यांनी त्यांना तळीराम दिसायचे. परंतु मानव धर्माचा प्रसार झाल्या पासून गावातली हि समस्या दूर झाली आहे. ते पुढे म्हणाले कि व्यसनमुक्ती झाली असून आता समाजातील लोकांनी उच्च शिक्षण घेऊन मोठे अधिकारी होणे गरजेचे आहे. कारण शिक्षणाना शिवाय प्रगती संभव नाही. गरिबांची पोर शिकली कि घरात असलेले दारिद्र्य दूर होऊ शकते. म्हणून आता समाजाला शैक्षणिक क्रांतीची गरज आहे. या नंतर तिसरा टप्पा हा समाजातून उद्योगपती नर्माण करायचा राहील.
कार्यक्रमाचे अवचित्य साधत समजतील प्रतिभाशाली विद्यार्थ्यांचे सत्कार आ. भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. सम्मेलनात मंचावर प्रमुख अतिथी म्हणून नरेंद्र झंझाड, सौ नंदाताई झंझाड, जयपाल बोरकर, इंद्रपाल माटे, गोपीचंद भोयर, गोपाल भुते, गोपीचंद भदाडे, भीमराव कायते तथा आयोजक म्हणून कृष्णा बांते, विलास बांते, चंदू चोपकार, राजू सेलोकर, गणेश बांते, नरेंद्र सोनवाणे व देविदास लुटे उपस्थित होते.