भंडारा :- महामार्ग पोलीस केंद्र जिल्हा भंडारा अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53
वर लाखनी ते भंडारा दरम्यान पलाडी गावाजवळ दुहेरी मार्गावरील पुलावर दोन ट्रकांची आमोरा समोर धडक झाल्याने दोन्ही ट्रकांना भीषण आग लागली
घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लिहित मतांनी यांना मिळतच ते तातडीने स्टाफसह घटनास्थळी पोहोचले या घटनेची माहिती स्थानीय पोलिसांना देण्यात आली व फायर ब्रिगेड यांना पाचारण करण्यात आले
फायर ब्रिगेड च्या गाड्या घटनास्थळी पोहोचून आग भिजवण्याचा प्रयत्न करीत आहेत पण आग आटोक्यात येत नसल्याची माहिती मिळालेली आहे या घटनेमुळे वाहतूक पूर्णपणे बंद असून पर्यायी मार्गाने वडवणी सुरू आहे
घटनास्थळी स्थानीय पोलीस व महामार्ग पोलीस केंद्र गोळेगाव चे स्टाफ हजर असून घटनास्थळी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे
