Homeताजा-खबरभरधाव टिप्परची उभ्या एसटीबसला धडक

भरधाव टिप्परची उभ्या एसटीबसला धडक

तुमसर आगाराची एसटी बस नागपूर येथून प्रवासी घेऊन वाराशिवणी कडे जात असतांना खापा तुमसर दरम्यान रस्त्याच्या बाजूला उभी असतांना विरुध्द दिशेने येणाऱ्या भरधाव टिप्परने एसटी बसला समोरुन धडक दिली. यात एसटी बसचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने प्राणहानी टळली. बसमधील ४४ प्रवासी थोडक्यात बचावले. या प्रकरणी तुमसर पोलीसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
तुमसर आगाराची एसटी बस क्र. एमएच ४० एन ९६१० ही दि. १९ मार्च रोजी सकाळी ८.१५ वाजता नागपूर येथून प्रवासी घेऊन वाराशिवणीकडे निघाली. भंडारा मार्गे तुमसर येथे बस जात असतांन सकाळी ११.०५ वाजता खापा तुमसर दरम्यान समोरुन येणार टिप्पर क्र. एमएच ४० एन ०५६० या चालकाने टिप्पर निष्काळजीपणं चालवीत असल्याचे दिसल्याने एसर्ट चालक विनोद भोंडे यांनी बस
रस्त्याच्या बाजूला उभी केली.दरम्यान भरधाव येणाऱ्या टिप्परने एसटी बसच्या एका बाजूला धडक दिली. त्यामुळे बस मागे घसाटत गेली. या धडकेत एसटी बसचे नुकसान झाले. यावेळी बस मध्ये ४४ प्रवासी असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात मात्र कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसुन बसमधील ४४ प्रवासी सुदैवाने बचावले. चालक विनोद भोंडे यांनी तुमसर पोलीसात तक्रार नोंदविली. तक्रारीवरुन तुमसर पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांचे मार्गदर्शनात पोलीस वाहतूक नियंत्रक साईराम गयगाये करीत आहेत।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img